
कोल्हापूर : जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. पालकमंत्री म्हणून नाव जाहीर झाले, त्यावेळी नामदार केसरकर कोल्हापुरात होते. पूर्व नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर, नामदार केसरकर थेट खासदार महाडिक यांच्या छत्रपती ताराराणी चौकातील संपर्क कार्यालयात आले. याठिकाणी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून, राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्याला विकासाचा आराखडा बनवू, असे त्यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक योजनांची त्यांना थोडक्यात माहिती दिली. यावेळी माजी नगर सेवक सत्यजित कदम, पृथ्वीराज महाडिक उपस्थित होते.
Leave a Reply