
कोल्हापूरःकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.,कोल्हापूर (गोकुळ) शनिवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे लंम्पीस्कीनच्या उपचार व लसीकरण बाबत संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक यांनी पशुसंवर्धन विभागाची आढावा मिटिंग घेतली.यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि लंम्पी त्वचा रोगावरील लसीकरणा संदर्भात गोकुळ व शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सामुदाईक काम करणे गरजेचे आहे. शासकीय अधिकारी व गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वय साधून मिटिंग घेणे व वस्तुनिष्ठ माहितीची चर्चा होणे महत्त्वाचे आहे. यामुळे जिल्ह्यातील लंम्पी लसीकरणाची मोहीम वेगाने पूर्ण होईल. १५ ऑक्टोबर पासुन जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होणार असून इतर जिल्ह्यातील ऊस वाहतुकीसाठी बैले व इतर जनावरे जिल्ह्यात येणार आहेत. येणाऱ्या जनावरांची योग्यती नोंद घेवून लसीकरण करण्यासाठीचे नियोजन करावे व खास करून शिरोळ, हातकणंगले,पन्हाळा,शाहूवाडी तालुक्यात व कर्नाटक सीमा भागातील संघाच्या वैद्यकीय अधिकारी यानां प्रामुख्याने लक्ष्य देण्याच्या सूचना दिल्या.यावेळी पशुसंवर्धन उपआयुक्त वा.ए.पठाणसो यांनी गोकुळ दूध संघ दूध उत्पादक व शासन शेतकऱ्यासोबत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून बाधित जनावरे इतर जनावरांपासून वेगळी करावीत. गोठ्याची साफसफाई, स्वच्छता करावी. गोचिड व माशांचा बंदोबस्त करावा. जनावरांवर उपचार कसे करुन घ्यावेत. यासंदर्भात मार्गदर्शन केले व जिल्ह्यातील लंम्पी रोगासंदर्भात केलेल्या उपायोजना नियाजानाची माहिती दिली.
Leave a Reply