
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचापाठोपाठ मनोज कोटक यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असून काँग्रेसकडून नारायण राणे, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर असे 3 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपचे 6 उमेदवार दिले आहेत. सेनेचेही 2 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचीही उमेदवारी आहे. तसंच प्रवीण दरेकर, आर.एन. सिंह आणि सुरजसिंह ठाकूर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. कोटक आणि प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे आता फक्त निवडणुकीची आैपचारिक्ता बाकी राहिली असून सर्वच उमेदवार विधानपरिषदेवर गेले आहे.
महाराष्ट्र विधान परिषद बिनविरोध आमदार आर एम् सिंह:- बीजेपी
प्रवीण दरेकर:- बीजेपी
विनायक मेटे:- बीजेपी
सदाभाऊ खोत:- बीजेपी
दिवाकर रावते:- शिवसेना
सुभाष देसाई:- शिवसेना
रामराजे निंबालकर:- एनसीपी
धनंजय मुंडे:- एनसीपी
नारायण राणे:- कांग्रेस
Leave a Reply