
कोल्हापूर:फिटजी या शैक्षणिक संस्थेच्यावतीने ८,९,१० वी आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी रविवार ४ सप्टेंबर रोजी प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रात २९ तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ केंद्रावर हि परीक्षा घेतली जाणार आहे.या परीक्षेसाठी विज्ञान,गणित आणि बौद्धिक या विषयांचा समावेश असणार आहे.कोल्हापुरातून २ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.उत्तम प्राशिक्षण आणि मार्गदर्शन सुविधांचा लाभ घेण्यासाठी तसेच देशातील अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची अद्वितीय संधी आणि आर्थिक आधार यानिमित्ताने विद्यार्थांना मिळणार आहे.४ सप्टेंबर ला दुपारी १ वाजता हि परीक्षा होणार असून या माध्यमातून ६०० विद्यार्थी निवडले जाणार आहेत.२७० मार्कांची हि परीक्षा असून निगेटिव्ह मार्किंगची पद्धत यात अवलंबिली जाणार असून पहिल्या ३ गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड,सिल्वर आणि ब्राँझ पदके तसेच प्रमाणपत्र आणि फिटजी येथे प्रवेश मिळविण्यासाठी शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे.अशी माहिती फिटजीचे डेप्युटी जनरल मॅनेजर निखील भटनागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुणवत्तेनुसारच विद्यार्थी निवड केली जाणार असून पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या ३० मुलांना, महाराष्ट्र शासन अग्निशमन विभागाच्या karmchary ३० मुलांना,१५ मुलींसाठी आणि मराठी माध्यमाच्या विद्यर्थ्याना २० टक्के जागा राखीव असतील.तसेच १ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी आपापल्या शाळेत किंवा www.fiitjeeonline.in या वेबसाईटवर जाऊन करावी.या परीक्षेचे शुल्क १०० रुपये असून आधी परीक्षा दिली असेल आते ५० रुपये आहे.परीक्षेचा निकाल १३ सप्टेंबरला ऑनलाईन लागणार आहे.तरी याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे अॅडमिशन एक्सिक्युटीव्ह संदीप पाटील यांनी सांगितले.
Leave a Reply