
कोल्हापूर: कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनला गौरवाची परंपरा आहे. महाराष्ट्रातील पहिले स्वायत्त तंत्रनिकेतन अशी या कॉलेजची ओळख आहे. अशा या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सध्या उपप्राचार्य अशोक उपाध्याय हे मुलींच्या वसतीग़ृहामध्ये जाताना महिला वॉर्डन, महिला प्रोफेसर, महिला कर्मचारी घेऊन जाणे असा सरकारी नियम असताना वारंवार हे उपप्राचार्य महाशय केवळ एकटेच नव्हे तर बरोबर तरुण मुलांना घेऊन त्यांची रजिस्टरमध्ये नोंद न करता जातात ही गोष्ट शरमेची आहे. या प्रकरणाची दखल कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनीही घेतली आहे. त्याचा अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आज उपप्राचार्य अशोक उपाध्याय यांना चांगलेच धारेवर धरले.
“उप प्राचार्यांना निलंबीत करा”, “उपप्राचार्यांचा धिक्कर असो” अशा घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाची समाधानकारक उत्तरे उपप्राचार्य देऊ शकले नाहीत. तसेच अनेक विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्रशासक दबावाखाली ठेवत असल्याची व निकृष्ठ प्रकारचे भोजन देत असल्याची तक्रार केली. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी येथील विद्यार्थ्यांना यासंदर्भात कोणतीही घटना व त्याबाबतची तक्रार लेखी स्वरुपात भाजपा जिल्हा कार्यालय बिंदु चौक येथे करावी असे आवाहन केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मेत्राणी, मारुती भागोजी, जिल्हा चिटणीस नचिकेत भुर्के, भाजयुमो जिल्हाध्यक्ष दिग्विजय कालेकर, सुमित पारखे, अक्षय मोरे, पारस पलिचा, पुष्कर श्रीखंडे, धैर्यशील देसाई, विश्वजित पवार, सिद्धांत भेंडवडे, स्वप्नील घुंटे, अनिकेत मोरे, अमित माळी, विवेक वोरा, सुजय मेंगाने, यश पोवार, परशुराम जाधव, शेखर जाधव आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply