कोल्हापूर: जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य कोणतीही पोस्टरबाजी, केक त्याचबरोबर अन्य खर्च टाळून “स्वच्छ भारत” अभियानाद्वारे पंचगंगा घाटाची स्वच्छता करुन खर्या अर्थाने मा.नरेंद्र मोदींना शुभेच्छा द्याव्यात अशी सुचना केली होती त्यानुसार आज भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने पंचगंगा घाट येथे “स्वच्छ भारत” अभियान राबवण्यात आले.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाजपा नेते महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ९.३० वाजता पंचगंगा घाट येथे काल झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील निर्माल्य, घाटावरील कचरा तसेच पाण्यातील हार व इतर प्लास्टीक साहित्य बाहेर काढून स्वच्छता केली. अवनी संस्थेच्या कर्मचार्यांनी या मोहिमेत सह्भाग दर्शवला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश देसाई व हेमंत आराध्ये यांनी पंचगंगा घाट परीसरावरील लहान मुर्त्या पुन्हा प्रवाहात नेऊन सोडल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक जे.सी.बी. त्याचबरोबर दोन डंपर इत्यादी मशनरी तसेच श्रमदानातून निर्माल्य बाहेर काढण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले की, भारतीय राजकारणाला, भारतीय अर्थव्यवस्थेला नव्हे तर संपुर्ण भारत देशाला एका नवीन ऊंचीवर नेऊन ठेवणारे आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणुन अत्यंत साध्यापणाने पंचगंगा घाट स्वछ करून साजरा करण्यात आला. पंतप्रधानांनी जो स्वच्छतेचा महामंत्र दिला आहे तो महामंत्र प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वॉर्डमध्ये आठवड्यातून दोन दिवस स्वत: श्रमदान करुन आपला परिसर स्वच्छ व निटनेटका राहण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे सांगीतले.माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले की, स्वच्छ भारत उपक्रम हा महाआंदोलनाच्या स्वरुपामध्ये संपुर्ण भारत देशात राबवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. याचा मुळ हेतू प्रत्येक भारतीयाला स्वच्छतेची सवय लागून त्याद्वारे आपला परिसर स्वच्छ ठेऊन विविध आजारांना अटकाव करणे हा आहे.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुभाष, संतोष भिवटे, अशोक देसाई, विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, दिलीप मेत्राणी, श्रीकांत घुंटे, जिल्हा चिटणीस अनिल काटकर, नचिकेत भुर्के, सुरेश जरग, कुलदिप देसाई, भाजपा गटनेते विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, अजित ठाणेकर, नगरसेविका सौ अश्विनी बारामते, सौ सविता भालकर, सौ गिता गुरव, आर.डी.पाटील, अशोक कोळवणकर, दिग्विजय कालेकर, गिरीष गवंडी, राजाभाऊ कोतेकर, अशोक लोहार, रणजित जाधव, पारस पलिचा, गोविंद पांडीया, पुष्कर श्रीखंडे, विजय सुतार, सौ भारती जोशी, सौ प्रभावती इनामदार, सौ सुलभा मुजूमदार, सौ सुनिता सुर्यवंशी, सौ प्रभा टिपुगडे, सौ पद्मीनी डोंगरकर, धनंजय जरग, संतोष माळी, विवेक कुलकर्णी, विशाल शिराळकर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply