
कोल्हापूर : इचलकरंजी येथे नगरपालिकेच्या मुख्य आधीकारींच्या केबिनच्या दरवाजाच्या समोर मृत आवस्तेततील डुक्करे व कचरा टाकण्यात आला.
तर भागातील कचरा उठाव मोहीम होत नसल्याने च्या कारणावरून नगरसेविका मंगल मुसळे यांचे पती बंडा मुसळे यांनी कचरा व डुक्करे नगरपालिकेत आणून टाकला.
तरी नगरपालिकेत एकच गोंधळ उडाला. आंदोलक काय शक्कल लढवतील याचा नेम नाही. इचलकरंजीमध्ये नगरपालिकेत आज मुख्याधिकार्यांच्या टेबलावर आंदोलकांनी चक्क मृत डुक्कर आणून टाकल्याची घटना घडलीये. राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला मुसळे यांचे पती बंडा मुसळेनं हे कृत्य केलंय.मेलेली डुक्कर उचलण्याची वारंवार मागणी करूनही इचलकरंजी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी दुर्लक्ष करताय. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला मुसळे यांचे पती बंडा मुसळे यांनी तीन डुक्करं थेट मुख्याधिकार्यांच्या दालनात आणून टाकली.स्वच्छतेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत डुक्कर हलवणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे नगरपालिकेत तणावाचं निर्माण झालं होतं. आंदोलकांच्या विरोधात कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं, तर आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं नागरिकांनीही पोलीस ठाण्यावर प्रति मोर्चा काढला होता.
Leave a Reply