
कोल्हापूर: गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरातील दसरा चौकजवळील सीपीआर चौक येथे माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला जाता आहे.कोल्हापुरातील हजारो दानशूर व्यक्तींनी कपडे,ब्लंकेत,चादरी,चप्पल,स्वेटर्स,दिवाळी फराळ,अशा अनेक वस्तू या ठिकाणी आणून ठेवल्या.गरजू लोक आपल्याला जे हवे ते तेथून मोफत घेऊन जात आहेत.ही माणुसकीची भिंत म्हणजे गरजू लोक आणि दातृत्वाची भावना ठेवणाऱ्या लोकांमधील दुवा ठरलेली आहे.आतापर्यंत हा उपक्रमात 3 हजार लोकांनी इथे वस्तू दान केलेल्या आहेत.या लोकांच्या नोंदी इथे आहेत.पण काहींनी तर निनावी वस्तू दान केल्या आहेत.आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी होत आहे.यात फक्त जुनेच नाही तर बालाजी कलेक्शनने नवीन ५१ ड्रेस इथे दिले आहेत.फक्त गरीब लोकच नाहीत तर गरजू ज्यांची घरची परिस्थिती फारशी चांगली नाही असे कॉलेजचे विद्यार्थीही इथून कपडे नेत आहेत.त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे असे आमदार बंटी पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे.आता उर्वरित सर्व कपडे आणि वस्तू वीटभट्टी कामगार,उस तोडणी कामगार यांना देण्यात येणार आहे.तसेच हा उपक्रम वर्षातून दोन वेळा राबविण्यात येणार आहे.आताच्या या उपक्रमानंतर गुडी पाडव्याच्या आधी चार दिवस म्हणजे २४ मार्च ते २७ मार्च या दरम्यान पुन्हा ही मोहीम राबविली जाणार आहे.या मोहिमेत डीवायपी कॉलेज,केएम सी कॉलेज यांनी सहभाग घेतला.पण हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुस्लीम बोर्डिंगचे सर्व सदस्य,समीर मुजावर,प्रसाद पाटील,देवेंद्र रासकर,अमर पाटील यांच्यासह प्रसार माध्यमातील पत्रकारांनीही सहभाग घेतला.यांच्या पुढाकारानेच गरीब आणि गरजूंची दिवाळी साजरी झाली.फक्त जे कपडे लोकांनी दिले आहेत ते स्वच्छ धुवून इस्र्ती करून द्यावेत असे आवाहन संयोजकांकडून केले आहे.
Leave a Reply