कन्‍नडिगांविरोधात कोल्हापुर शिवसेना रस्त्यावर

 
img-20161105-wa0007कोल्हापुर:कर्नाटकमधील बेळगावात कानडी अत्याचाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकमधून येणारी वाहने रोखत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
 बेळगावसह सीमाभागात १ नोव्‍हेंबर हा काळा दिन म्‍हणून पाळण्‍यात येतो. यंदाच्‍या काळ्‍या दिनाच्‍या फेरीत बेळगावच्‍या महापौर सरिता पाटील व उपमहापौर संजय शिंदे हे सहभागी झाले होते. याचा राग कन्‍नडिगांना आला आहे. त्‍यामुळे बेळगावात सध्‍या तणावाचे वातावरण आहे. या घटनेचे पडसाद कोल्हापूरमध्येही उमटले असून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकमधून येणारी वाहने रोखत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आज पुणे बंगलुरु महामार्गावर वाहने रोखण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!