
कोल्हापूर: १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे निमित्त करून कर्नाटक पोलिसांनी ३७ कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना रात्रभर डांबून ठेऊन जनावरांसारखी अमानुष मारहाण केली. कर्नाटक पोलिसांची आणि कर्नाटक सरकारची हि क्रूरता कोणत्याही परिस्थिती मध्ये खपवून घेणार नाही. मराठी माणसांवर अन्याय कराल तर जशास तसे उत्तर शिवसैनिक देतील, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. बेळगावात मराठी युवकांना झालेल्या बेदम मारहाणीचा निषेध करीत आज शिवसेनेने कर्नाटकी पोलिसांच्या प्रतिमेचे दहन केले.
दुपारी ५ च्या सुमारास शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक छ. शिवाजी चौक येथे जमले. याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक पोलिसांचा धिक्कार असो” “कर्नाटक पोलिसांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत छ. शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला यावेळी सीमा बांधवांवर अमानुष मारहाण करणाऱ्या कानडी सरकारी गुंडांच्या पुतळ्याचे दहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, आधी कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडान कडून सीमा बांधवांवर अत्याचार होत होते. परंतु आता कर्नाटक पोलीसही कानडी गुंडाच्या क्रूरकृत्यास साथ देत. मराठी बांधवांवर अन्याय करून अमानुष मारहाण करत आहेत. त्यामुळे हे लोकांच्या संरक्षणासाठी असणारे पोलीस नसून कानडी सरकारी गुंड आहेत. या कानडी सरकारी गुंडांना मराठी माणसाचा इतिहास माहित नाही. अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची तयारी टाकत मराठी माणसांच्यात आहे. पिसालेल्या जनावराप्रमाणे माज या कर्नाटकी सरकार ला आला असून मराठी माणसांवर होणाऱ्या प्रत्तेक घावाचा बदला घेतला जाईल. सीमा भागातील मराठी माणसावर दडपशाही करण्याचे प्रकार कोल्हापूर शिवसेनेने अनेक वेळा उधळून लावले असून, खबरदार मराठी माणसांच्या वाटेला जाल तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.या वेळी शिवसेना गटनेता नियाज खान, महेश उत्तुरे, राजू हुंबे, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, रमेश खाडे, सुनील जाधव, किशोर घाटगे, विशाल देवकुळे, अमित चव्हाण, धनाजी दळवी, जयवंत हरुगले, दीपक चव्हाण, अश्विन शेळके, पियुष चव्हाण, चेतन शिंदे, प्रकाश सरनाईक, राज जाधव, सुरेश कदम, सनी अतिग्रे, महिला आघाडीच्या सौ.मंगल साळोखे, सौ.पूजा भोर, सौ.शाहीन काझी, कु. रुपाली कवाळे यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply