नॅनो तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर केमोथेरपीविना उपचार शक्य: प्रा. फ्रॅन्कॉइस बर्जर

 

कोल्हापूरfrancios-berger: नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनामुळे केमोथेरपी आणि औषधांविनाउपचार करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीयख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व फ्रान्समधील ग्रीनोबेल विद्यापीठाच्याक्लिनटेक संस्थेचे संचालक प्रा.डॉ. फ्रॅन्कॉइस बर्जर यांनी आजयेथे केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘ग्यान’उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अँडटेक्नॉलॉजी अधिविभागामार्फत ‘वैद्यकीय शास्त्रातीलनॅनोटेक्नॉलॉजीचे महत्त्व’ या विषयावर राजर्षी शाहू सभागृहातआयोजित सार्वजनिक व्याख्यानामध्ये ते बोलत होते. परीक्षानियंत्रक महेश काकडे अध्यक्षस्थानी होते.       अत्यंत प्रभावी सादरीकरणाद्वारे सुमारे दोन तास श्रोत्यांवर आपल्या ज्ञानाची मोहिनी घालून खिळवून ठेवणाऱ्या डॉ.बर्जर यांनी वैद्यकशास्त्र व नॅनो तंत्रज्ञान यांचा सद्यस्थितीतील परस्परसंबंध स्पष्ट केला. ते म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रासाठी नॅनो तंत्रज्ञानाद्वारे तयारकरण्यात आलेली उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरली असूनत्याद्वारे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच त्याची पूर्वसूचनामिळविणे शक्य झाले आहे. त्यामुळे हृदयरुग्णावर वेळेतउपचार होण्यास मदत होणार आहे. नॅनो संशोधनातीलक्रांतीमुळे मायक्रोस्कोपिक साधनांचा अत्यंत कमी वापर होतअसून शरीरातील व्यंग दूर करणे शक्य झालेले आहे. नॅनो तंत्रज्ञान हे वैद्यक शास्त्रासाठी मोठे वरदान ठरले असून भविष्यात या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठमोठ्या शस्त्रक्रिया टाळून रुग्णांवर सुलभ पद्धतीने शस्त्रक्रिया व उपचार करता येणे शक्य आहे.

परीक्षा नियंत्रक महेश काकडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले,नॅनो टेक्नॉलॉजीतील संशोधन संपूर्ण मानवजातीच्याकल्याणासाठी उपयुक्त ठरणारे असून या क्षेत्रामध्ये संशोधनकरण्याची प्रचंड संधी संशोधकांना उपलब्ध झालेली आहे.
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो-सायन्स अँड टेक्नॉलॉजीचेसमन्वयक डॉ.पी.एस.पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचेमहत्व विषद केले. मेंदूशास्त्रज्ञ डॉ.शिवदत्ता प्रभू यांनी प्रा. बर्जरयांचा परिचय करुन दिला. के.डी.पवार यांनी सूत्रसंचालन केले,तर अर्पिता तिवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठीविद्यापीठातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच विज्ञानप्रेमीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!