सह्याद्री आणि सनराईज हॉस्पिटलच्यावतीने कोल्हापुरात यकृतविकारसंबंधी ओपीडी सेवा सुरु

 

कोल्हापूर: आपल्या शरीरातील चयापचयाशी संबंधित असणारे महत्वाचे कार्य यकृतामार्फत केले जाते. यासोबतच शरीरातील शर्करेची योग्य पातळी राखणे,कॉल्स्ट्रोल प्रमाण नियंत्रित ठेवणे,छोट्या-मोठ्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला ताकद देणे,तसेच विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकणे यासारखी अनेक कार्ये यकृतामार्फत केली जातात.बदलती जीवनशैली,मद्यपान,खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी यासरख्या कारणांमुळे यकृताला होणारे विकार जसे की कावीळ,फॅटीलिव्हर,हिपोटायटीस, यासारख्या विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.लिव्हरच्या विकारांचे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे आहे.तसे नाही झाल्यास या विकारांचे अॅक्यूट आणि क्रोनिक लिव्हर फेल्युअरमध्ये रुपांतर होते.यामुळेच इतर अवयवांप्रमाणे यकृतचे आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे.
यासाठीच पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटल आणि कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सनराईज हॉस्पिटलचे डॉ.अभिजित कोराणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सह्याद्री हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.बिपीन विभूते,मनीष पाठक आणि डॉ.राहुल सक्सेना या ओपीडीत उपलब्ध असतील.या महिन्याच्या १५ डिसेंबररोजी म्हणजे उद्या ही सेवा सुरु होत आहे.अधिक माहितीसाठी सनराईज हॉस्पिटल राजारामपुरी,फोन-०२३१-२५३२९६९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन हॉस्पिटलकडून केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!