
कोल्हापूर: द इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरकडून कोल्हापूर सेंटरला सर्वोकृष्ट पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच कोल्हापूर सेंटरचे चेअरमन प्रसिद्ध आर्किटेक सतीशराज जगदाळे यांनाही उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.बेंगलोर येथील राष्ट्रीय परिषदेत आयआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दिव्य कुश यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
देशभरातील शिखर संस्था असलेल्या या संस्थेच्या ४५ सेंटर्समध्ये वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊन पुरस्कर वितरण केले जाते.कोल्हापूर सेंटरच्या वैविध्यपूर्ण उपक्रमांची दाखल घेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार या सेंटरला देण्यात आला.कालिकत आणि कोल्हापूर या सेंटरचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग,बैठकींचे सातत्यपूर्ण नियोजन,शिक्षक दिन,आर्किटेक डे,विविध सामाजिक उपक्रम ज्याचा लाभ कोल्हापूरसह सांगली,सातारा या जिल्ह्यातील आर्किटेक्ट आणि इंटरीयल डिझाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला आहे. यामुळेच या सेंटरला उत्कृष्ट सेंटर म्हणून घोषित करण्यात आले.
या सर्व उपक्रमांसाठी राष्ट्रीय कार्यकारणीचे खजिनदार सुनील दिगवेकर,महाराष्ट्र चप्तर चेअरमन सतीश माने,महेश डोईफोडे,सल्लागार शिरीष बेरी यांनी परिश्रम घेतले.सेन्टरच्या संगीता भांबुरे,प्रिया देशपांडे,गिरीजा कुलकर्णी,जयंत बेगमपुरे,विजय कोराणे,दिलीप कुलकर्णी,सुनील विचारे,अशोक रेंगडे यांच्यासह पदाधिकारी आणि सल्लगार यांनी पुरस्कार स्वीकारला.
Leave a Reply