
कोल्हापूर :राज्याच्या वैघकीय विश्वात महत्त्वाची असलेल्या महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात आज 24 टक्के मतदान झाले. बारा तालुक्यातील एकूण 2127 पैकी 500 डाँक्टर मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.सीपीआर परिसरातील बहुऊदेशीय सभागृहात हे मतदान झाले.एकुण 36 जिल्ह्यातील 65 मतदार या साठी हक्क बजावणार होते.एम.एम.सी.चे माजी अघ्यक्ष डाँ.अशोक तांबे यांच्या इंडियन मेडीकल कौन्सिल प्रणित पँनेलसह प्रगती सह एकूण पाच पँनेल या निवडणूकीत आहेत.यात कोल्हापूर चे एकमेव डॉ .सुरज पवार हे एकमेव ऊमेदवार होते.डॉक्टर सुरेश प्रभु ,डॉ .संदीप आडनाईक ,संदीप पाटील,सह शासकीय वैघकीय विश्वातील डाँ.मेगडेसह जिल्हा क्षयरोग आघिकारी ऊषदेवी कुंभार सह मान्यवरानी आज मतदान केले.येत्या 23 डिसेंबर रोजी मुंबईत शासकीय दंत वैघकीय महाविद्यालयात राज्यातील मतपेट्या एकत्र करुन मतमोजणी होणार आहे.या कडे अवघ्या वैघकीय विश्वाचे लक्ष लागून राहीले आहे.
Leave a Reply