कलामहर्षी बाबुराव पेंटर पुरस्कार शाजी करुण यांना तर आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार विक्रम गायकवाड यांना जाहीर
कोल्हापूर :अखिल भारतीय चित्रपट महामंडळ,महाराष्ट्र शासन आणि कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 व्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार यावर्षी कलामहर्षी बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार मल्ल्याळम दिग्दर्शक शाजी करूण यांना तर चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषणकार विक्रम गायकवाड यांना जाहीर झाला आहे. या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ उद्यापासून शाहू स्मारक भवन येथे होणार असून विविध भाषेतील चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.उद्या २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता समारंभपूर्वक कलामहर्षी बाबुराव पेंटर या पुरस्काराचे वितरण होईल.आणि महोत्सवाची सांगता आनंदराव पेंटर पुरस्कार प्रदान करून करण्यात येईल.विविध विषयावरील आणि विविध ढंगाचे चित्रपट विशेष आकर्षण ठरतील.आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट रसिकांसाठी दाखविले जाणार असून दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुक्त संवादात कलावंत.दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्या भेटी,चर्चा आदि कार्यक्रम होणार आहेत.त्याचबरोबर माय मराठी पुरस्कार आणि विविध लघु पुरस्करांचे वितरण होणार आहे अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी दिली.उद्याच्या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply