कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी 322 उमेदवार तर पंचायत समितीच्या 134 गणांसाठी 583 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. नामनिर्देशनपत्रे माघार घेतल्यानंतर आज जिल्हा परिषदेसाठी 322 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांची तालुकानिहा माहिती अशी. शाहूवाडी तालुका -15, पन्हाळा तालुका 29, हातकणंगले तालुका 55, शिरोळ-33, कागल 23, करवीर 66, गगनबावडा 9, राधानगरी 20, भुदरगड-21, आजरा 8, गडहिंग्लज 20 आणि चंदगड तालुक्यात 23 उमेदवार आहेत. तर पंचायत समितीसाठी 583 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांची तालुकानिहाय माहिती अशी. शाहूवाडी तालुका -24, पन्हाळा तालुका 50, हातकणंगले तालुका 106, शिरोळ-57, कागल 39, करवीर 99, गगनबावडा 15, राधानगरी 46, भुदरगड-42, आजरा 24, गडहिंग्लज 46 आणि चंदगड तालुक्यात 35 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Leave a Reply