
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या बुधावर दि.३०/०३/२०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वार्षिक अंदाजपत्रक उपसूचनेसह मंजूर करण्यात आले. पुरेशी व सारासार चर्चा न करताच या अंदाजपत्रकास घाईगडबडीने मंजुरी देण्यात आली. त्यातच सभागृहात एका वाक्यानेही चर्चा न झालेल्या प्रवेशकराचा विषय दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात मोठा गाजावाजा करून प्रसिद्ध करण्यात आला. या सगळ्यामागे सत्ताधाऱ्यांचे काय गुपित दडलेले आहे हे शोधून काढावे लागेल. तसेच सध्याची करसंग्रहण व्यवस्था पूर्णपणे कार्यक्षम व अद्यावत केल्याशिवाय प्रशासनाने कोणतीही नवीन कराचा प्रस्ताव आणल्यास भारतीय जनता पार्टी त्याला विरोधच करेल असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी केले. भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने प्रवेश कराच्या विषयासंदर्भात आज को.म.न.पा आयुक्त यांना निवदेन देण्यात आले.
या विषयातील चर्चेमध्ये सहभागी होत जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष श्री महेश जाधव, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, सुरेश जरग यांनी आकारण्यात येणाऱ्या घरफाळ्यात कमालीचे घोळ, घरफाळा थकबाकीची रक्कम, शहरातील अनेक इमारतींना घरफाळाच लागू नसणे, अंदाजपत्रकातील त्रुटी, गाळेधारकांचे प्रश्न, मनपाने भाड्याने दिलेल्या जमिनी, पार्किंग ठेके, बोटिंग ठेका या संदर्भामध्ये वेळोवेळी महानगरपालिका सर्वसाधारण सभेमध्ये भाजपा नगरसेवकांनी विविध त्रुटी सभागृहासमोर मांडलेल्याच आहेत. पुन्हा एकदा भाजपा शिष्टमंडळाने आयुक्तांच्या समोर या त्रुटी कागदोपत्री सादर केल्या.
परंतु ठिम्म प्रशासन कोणत्याही त्रुटीची सुधारणा न करता केवळ कर वाढवणे हा एकच विषय सभागृहांसमोर मांडते. त्यामुळे वरील सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून करसंग्रहण वाढवून महानगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण कराव्यात अशी सुचना शिष्टमंडळाच्यावातीने मांडण्यात आली.
शिष्टमंडळाल उत्तर देताना आयुक्त म्हणाले, पथकर आकाराण्याच्या संदर्भात महानगरपालिकेच्या वतीने कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. याविषयावर गांभीर्याने विचार करून शिष्टमंडळाने सुचवलेल्या सर्व पर्यायांवर महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वस्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस विजय जाधव, संतोष भिवटे, उपाध्यक्ष श्री हेमंत आराध्ये, श्री अमोल पालोजी, दिलीप मेत्राणी, सुरेश जरग, अशोक लोहार, सतीश घरपणकर, सयाजी आळवेकर, हर्षद कुंभोजकर, नचिकेत भुर्के, अक्षय मोरे, रतन बाणदार, संदीप कुंभार, पपेश भोसले, विजय अग्रवाल, सौ भारती जोशी, आकुताई जाधव, गिरीष साळोखे, स्वप्नील घुंटे, अमित माळी आदींसह भाजापा पदाधिकारी उपस्थित होते
Leave a Reply