
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन २०१७साठीचा ‘प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार’ यंदा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. १,५१,००० रुपये, समानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असून येत्या १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होईल, असेही त्यांनी सांगितले.
श्रीमती शालिनी रामचंद्र कणबरकर आणि शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मरणार्थ ‘प्राचार्य रा. कृ.कणबरकर पुरस्कार’ दर वर्षी त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजे दि. १३एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठामार्फत प्रदान केला जातो. यापुरस्कारासाठी भाषा, साहित्य, शास्त्र, सामाजिक व नैसर्गिक,कला, क्रीडा, समाजसेवा तसेच सामाजिक हिताचे लक्षणीय कामकरणारी व्यक्ती/ संस्था यांच्या कार्याचा आढावा घेऊन पुरस्कारदेण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते. गत वर्षी पहिला पुरस्कार भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव यांना प्रदान करण्यात आला होता
Leave a Reply