
कोल्हापूर: ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरीत केला जाणार आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एन.यु.दुआ यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे उद्या सकाळी १० वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती अहिराचे जिल्हाध्यक्ष आर.डी.जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार अनिल देशमुख.प्रताप नाईक,मोहन गोखले,शिक्षिका अलका कारंजकर,मुख्याध्यापक भीमराव आव्हाड यांच्यासह आपल्या कार्यातून मानवाला न्याय व हक्क मिळवून देणारे अश्या विविध मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.शाल,श्रीफळ,मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे याचे स्वरूप आहे.यानंतर मार्गदर्शन मेळावा होणार आहे.मानवी हक्कापासून वंचित राहणाऱ्या घटकांना मदत करण्याचे कार्य ही संघटना गेली १२ वर्ष करत आहे असे सलीम मुल्ला यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला अजित सानप,जावेद तांबोळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply