वाढदिवसाच्या निमित्ताने मुकेश अंबानींची शिर्डी संस्थानला ७५लाख रुपये मदत

 

शिर्डी : रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी यांनी एकसष्ठीत पदार्पण केलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डीतील साई संस्थानाच्या रुग्णालयाला अंबानी यांनी 75 लाखांची मदत केली आहे.
साठाव्या वाढदिवसानिमित्त साई संस्थानाच्या रुग्णालयासाठी मशिनरी आणि इतर साहित्य खरेदीसाठी मदत करण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गिरीष टी. वाशी यांनी संस्थानला ईमेल पाठवल्याची माहिती कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
19 एप्रिलला मुकेश अंबानी यांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्त प्रसादभोजनासाठीही त्यांनी 4 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या जिओने देशभरातील नेटिझन्सना दिलासा दिला होता. साठीनिमित्त मुकेश अंबानी कुठली नवी घोषणा करणार का, याकडे तमाम देशवासियांचे डोळे लागून राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!