कोल्हापूर: पुणे विभागीय म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झालेबाद्द्ल समरजीतसिंह घाटगे यांचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण राज्यमंत्री सौ विद्याताई ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपा संघटन मंत्री बाबा देसाई, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना महिला व बालकल्याण राज्यामंत्री सौ विद्याताई ठाकूर म्हणाल्या की, गेली कित्येक वर्षे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून समाजच्या विकासासाठी कार्यरत आहे. खर्या अर्थाने या देशाला परमवैभव प्राप्त करून देण्याचा विचार पार्टीचा आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी समाजोन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकारची योजना तळागाळातील पोचवावी.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल तथा पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यावर म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून म्हाडाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहीन त्याचबरोबर येत्या विधानसभे मध्ये कागल मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार होणाराच असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजपा जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई म्हणाले, पं.दिनदयाळ उपाध्याय जन्म शताब्दी निमित्य सर्व कार्यकर्त्यांना १५ दिवसांच्या पूर्णवेळ प्रचारासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, महसूल मंत्री नाम.चंद्रकातदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झपाट्याने घडवलेला आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी पं.दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेमध्ये १५ दिवस पूर्णवेळ विस्तारक म्हणून बाहेर पडावे असे आव्हान केले.
याप्रसंगी जिल्हाधयक्ष संदीप देसाई यांनी म्हाडाच्या माध्यमातून राजेंनी कोल्हापूरच्या जनतेसाठी म्हाडाचे विविध प्रकल्प राबवून जास्तीत जास्त लोकांना घरे मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे तर महिला व बालकल्याण विभागा मार्फत महिलांना रोजगार निर्मितीसाठी विविध प्रकल्प उपलब्ध करून द्यावेत असे सुचीवले. कायर्क्रमाचे सूत्र संचालन सरचिटणीस विजय जाधव यांनी तर आभार जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी मानले.
याप्रसंगी भाजपा गटनेते विजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंत आराध्ये, श्री अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, गणेश देसाई, मारुती भागोजी, नगरसेविका सौ सविता भालकर, सौ उमा इंगळे, सौ अश्विनी बारामते, श्री संपतराव पवार, संतोष माळी, विवेक कुलकर्णी, राजू मोरे, संजय सावंत, नजीर देसाई, भारती जोशी, किशोरी स्वामी, मधुमती पावनगडकर, सुरेश जरग, नचिकेत भुर्के, प्रभावती इनामदार, सुलभा मुजुमदार, प्रभा टिपुगडे, दिग्विजय कालेकर, राजाभाऊ कोतेकर, राजू माळगे, सौ विद्या पाटील, एस.बी.भागवत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply