
कोल्हापूर: रक्तातील कॅन्सर या आजारावरील ज्या रुग्णांना किमो थेरपी उपचार पद्धतीने फरक पडत नाही तसेच अप्लास्टीक अॅनिमिया लिम्फ्लोमा,अँक्युट ल्युकेमिया,मल्टीमल मायलोमा यासारख्या रक्तातील आजारांसाठी एकमात्र गुणकारी उपचार पद्धती म्हणजे स्टेम सेल उपचार पद्धती आहे.या अत्याधुनिक प्रत्यारोपणामुळे अनेक रुग्ण कायमस्वरूपी बरे झाले आहेत.रुग्णांचे भाऊ किंवा बहिण स्टेम सेल दाता बनू शकतात.यालाच डोनर असे म्हणतात.आजवर या उपचारपद्धतीचा वापर करून वरील सर्व आजार बरे करण्यात यश मिळवले आहे अशी माहिती एम.डी रक्तरोग तज्ञ डॉ.अभिजित गणपुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्टेम सेल प्रत्यारोपण ही एक सांघिक प्रक्रिया आहे.याकरिता प्रशिक्षित हेमँटोलॉजिस्ट,चांगली रक्त पेढी सेवा,किरणोत्सर्ग युनिट,प्रशिक्षित परिचारिका आणि रुग्णांसाठी चांगले वातावरण यांची गरज असते.या सर्व सुविधा आता कोल्हापुरात राजारामपुरी ८ वी गल्ली येथील वसंत प्राईडमध्ये निश हेमँटोलॉजी केअर येथे उपलब्ध झालेल्या आहेत.अश्या रुग्णांना आता पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज नाही असेही डॉ.गणपुळे यांनी सांगितले.कोल्हापुरातील हा प्रत्यारोपण कार्यक्रम हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला प्रत्यारोपण कार्यक्रम आहे.पत्रकार परिषदेला डॉ.गौतमी गणपुळे यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
Leave a Reply