
कोल्हापूर: कोल्हापूर पोलीस उद्यान येथे देशातील सर्वाधिक उंची असणार्या ध्वजस्तंभातील दुसर्या क्रमांकाचा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्हापालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ध्वजस्तंभ उभारणीसाठी विशेष प्रयत्न केलेआहेत. आज दि.२२ रोजी या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार अमल महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली. १ मे रोजी मा.मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते या ध्वजाचे उद्घाटन होणार आहे.
हे उद्यान पोलिस मुख्यालयासमोरील 1 लाख चौरस फुटांच्या जागेत असून याठिकाणी २२ फुट कारंजा, सेल्फी पॅाईंट, चिल्ड्रन पार्क, स्वातंत्र लढयासंबंधी माहिती आदींचा समावेश असणार आहे.कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. या सुरु असलेल्या कामाबाबत के.एस.बी.पी.चे सुजय पित्रे यांनी सविस्तर माहिती देऊन याबाबतचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. या ध्वजस्तंभाचे उद्घाटन १ मे रोजी दुपारी ४ वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील व डायरेक्टर जनरल महाराष्ट्र पोलिस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आज या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार श्री अमल महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई, माजी अध्यक्ष श्री महेश जाधव, सरचिटणीस श्री सुभाष रामुगडे, गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक सत्यजित कदम, किरण नकाते, संतोष गायकवाड, विजय खाडे, शेखर कुसाळे, निलेश देसाई, नगरसेविका सौ उमा इंगळे, सौ अश्विनी बारामते, अॅड. संपतराव पवार, आर.डी.पाटील, मारुती भागोजी, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, गणेश देसाई, संजय सावंत, सयाजी आळवेकर, कमलाकर जगदाळे, मामा कोळवणकर, नचिकेत भुर्के, अक्षय मोरे, अविनाश कुंभार, विवेक कुलकर्णी, प्रदीप पंडे, रविंद्र घाटगे, सतीश कांबळे, आदींसह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
Leave a Reply