मराठीतली पहिली सायफाय लव्हस्टोरी ‘फुंतरू’ येत्या ३० एप्रिल रोजी स्टार प्रवाहवर

 

मुंबई:मराठी इतकाच बॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फुंतरू’ या मराठी चित्रपटातून मराठीत पहिलीच सायन्स फिक्शन लव्हस्टोरी सादर करण्यात आली. मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आता स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून ३० एप्रिल रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.
इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘फुंतरू’ची कथा पडद्यावर सादर करण्यात आली आहे. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान पावलोपावली मानवाची साथ देत आहे. प्रगत तंत्रज्ञान हे आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण या तंत्रज्ञानाने तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवले तर काय होऊ शकते त्याचं चित्रण ‘फुंतरू’मध्ये करण्यात आलं आहे.

युवा पिढीची आवडती नायिका केतकी माटेगावकर आणि मदन देवधर या मुख्य जोडीसोबत या चित्रपटात शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, ऋतुराज शिंदे, अंशुमन जोशी, रोहित निकम आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुजय डहाकेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. गीतकार वैभव जोशी आणि मंदार चोळकर यांच्या गीतांना ऋषिकेश दातार, जसराज जोशी आणि सौरव भालेराव या संगीतकार त्रयीने या गीतांना स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटातली अलख निरंजन, ती मी अशी गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेला सायन्स फिक्शन हा प्रकार फुंतरूच्या रुपानं पहिल्यांदाच मराठीत आला. त्याला प्रेक्षकांकडूनही दाद मिळाली. आता स्टार प्रवाहच्या माध्यमातून हा चित्रपट घराघरांत पोहोचणार आहे. मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणाऱ्या ‘फुंतरू’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ३० एप्रिल रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता आवर्जून पहायलाच हवा असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!