
मुंबई :सावली केअर सेंटर या कोल्हापूर मध्ये कार्यरत असणा-या संस्थेला, मा. दिनानाथ मंगेशकर यांच्या ७५ व्या पुण्यतिथि निमित्त्य षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे झालेल्या शानदार समारंभात, सामाजिक संस्थांना देण्यात येणारा ‘आनंदमयी’ पुरस्कार सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात कौशिकी चक्रवर्ती (गायन), कपिल देव (खेळ), अमिर खान (चित्रपट निर्मिती), सुनिल बर्वे (नाट्य निर्मिती), उदय निरगुडकर (पत्रकारिता), विजया राजाध्यक्ष (जीवन गौरव साहित्य), वैजयंतीमाला (जीवन गौरव चित्रपट), आशालता वाबगांवकर (जीवन गौरव नाट्यक्षेत्र), विश्वनाथ कराड (जीवन गौरव शिक्षण) यासारख्या दिग्गजांना गौरवण्यात आले.
याप्रसंगी बोलताना किशोर देशपांडे म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून, सावलीवर विश्वास टाकून आपले आप्त सुश्रुषेसाठी सावलीत दाखल करणा-या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान मधील शेकडो कुटुंबांचा, रुग्णांची निरलस प्रेमाने सेवा करणा-या ६० हून अधिक कर्मचा-यांचा, सावलला आपली समजणा-या कोल्हापूरकरांचा हा सन्मान आहे. त्यांचा एक प्रतिनिधि म्हणुन मी तो स्विकारत आहे. मोहन भागवत यांनीही त्यांच्या मनोगतामध्ये सावली च्या कामाचा आवर्जुन उल्लेख करून कौतुक केले.यानंतर राहुल देशपांडे, महेश काळे आणि कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाचा सुरेल कार्यक्रम झाला.
Leave a Reply