
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हाज कमिटीच्यावतीने हाजी लोकांचे मार्गदर्शन शिबीर बुधवारी ३ जून रोजी दसरा चौक येथील मुस्लीम बोर्डिंग हॉल येथे सकाळी १० ते ५ वेळेत आयोजित केले आहे.या शिबिरात स्क्रीनमार्फत सविस्तर माहिती दाखविण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचे हाज कमिटीचे चेअरमन इब्राहिम शेख व कमिटीचे सदस्य यांची उपस्थिती असणार आहे.हाज कमिटी आणि टूर ट्रॅव्हल्सद्वारे हाज यात्रेला जाऊ इच्छीणाऱ्या भाविकांसाठी हे शिबीर खुले असणार आहे.तरी सर्व हाजी लोकांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन इकबाल देसाई,गणी इनामदार, हमजेखान शिंदी, सलीम बागवान, सादतखान पठाण यांनी केले आहे.
Leave a Reply