
मुश्रीफ फौंडेशनचे आज गणराया अॅवॉर्ड
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ना. हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने यावर्षी गणराया २०१६ हा अॅवॉर्ड सोहळा (दि.२३) ऑगस्टला शाहू स्मारक भवन येथे ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडणार आहे.यावेळी उत्कृष्ठ गणेश मुर्ती आणि समाजप्रबोधन केलेल्या सजीव आणि तांत्रिक देखाव्यांसाठी हा अॅवॉर्ड देण्यात येणार आहे.
यावेळी समाजप्रबोधनपर उत्कृष्ठ सजीव देखाव्यांसाठी प्रथम क्रमांकासाठी १ लाख रूपये, चषक आणि प्रशस्तिपत्रक देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच तांत्रिक देखाव्यांसाठी २ लाख रूपये, चषक आणि प्रशस्तिपत्रक देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गणेशमुर्त्यांसाठी विजेत्या मंडळांना प्रत्येकी ५ हजार, चषक आणि प्रशस्तिपत्रक देवून गौरवण्यात येणार आहे.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर, अनिल कदम, जाहिदा मुजावर, बाबासाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply