
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव आणि कोषाध्यक्ष पदी सौ.वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली.आज देवस्थानच्या कारभाराबद्दल आणि भविष्यातील नियोजनाबद्दल पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष महेश जाधव म्हणाले पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार तसेच कुणालाही तो करू देणार नाही आणि आतापर्यंत जर काही भ्रष्टाचार झाला असेल तर दोषींवर कारवाई केली जाईल.तसेच कोल्हापूरची अंबाबाई आणि जोतीबा तीर्थक्षेत्र विकासाला प्राधान्य देणार,श्री करवीर निवासिनी मंदिरात अनेक नियोजित प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ऐखत्यारीत एकूण ३०४२ मंदिरे येतात.या सर्वच मंदिरांच्या विकासाला प्राधान्य देणार आहे.अंबाबाई मंदिरात सुरक्षिततता,भाविकांसाठी योग्य प्रसाद,मुबलक पाणी,प्रथमोपचार केंद्र व्यवस्था,महिलांसाठी स्वच्छता गृहे,भाविकांची संख्या मोजण्यासाठी मशीन्स,फेस कॅम्प,सीसीटीव्ही कॅमेरे,देवस्थान समितीचे स्वतःचे अन्नछत्र,भक्त निवास,बहुमजली पार्किंगसारख्या सुविधांना प्राधान्य देऊन निधीचा वापर सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.याच बरोबर टेंबलाई मंदिर आणि परिसर तसेच जोतीबा तीर्थक्षेत्र विकासही लवकरच करण्यात येणार आहे.देवस्थान समितीच्या आर्थिक स्थितीचा अहवाल डिसेंबर २०१७ पर्यंत जाहीर केला जाणार आहे.मंदिर परिसरात दुकानदारांना नोटीस देऊन प्लास्टिक पिशव्याबंदी करण्यात येणार आहे.सर्व प्रणाली संगणीकृत करण्यात येणार असून येत्या नवरात्र उत्सवात उच्च दर्जाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोषाध्यक्ष पदाची ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे ती योग्य पद्धतीने सांभाळून विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला सदस्या सौ.संगीता खाडे,सचिव विजय पोवार उपस्थित होते.
Leave a Reply