
कोल्हापूर:इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्य बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज धनंजय महाडिकने रेस जिंकून प्रथमस्थान पटकावले. १९ वर्षांच्या खंडानंतर भारतीय रेसरला ही किमया साधता आली आहे. त्याच्या यशाची दखल देशातील सर्वोच्च सभागृह अर्थात संसदेनेही घेवून अभिनंदन केले होते. यशस्वी कामगिरी केल्यानंतर कृष्णराजचे बुधवार दि. ३० ऑगस्ट २०१७ रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. कृष्णराज महाडिकचे जल्लोषी स्वागत करण्याचे नियोजन क्रीडाप्रेमी आणि धनंजय महाडिक युवाशक्तीने केले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी १०.३० वाजता ताराराणी चौकात कृष्णराजचे स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून कृष्णराजची मिरवणूक काढली जाणार आहे. या सोहळ्याला शहर आणि जिल्हयातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन युवाशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply