
गारगोटी: सर्वोच्च न्यायालयाचा ध्वनिप्रदूषणबाबत आदेशाचे पालन पालकमंत्र्यांनी ज्या जिद्दीने केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सर्व अधिकाऱ्यांचेही अभिनंदन परंतु ज्या काळ्या पैशाच्या आधारे जातीयवादी संघटना पुरोगामी विचारवंताचे एका पाठोपाठ एक खून करत सुटले आहेत याचा निषेध करून त्यांना का चाप लावत नाही?
गौरी लंकेश या कर्नाटकच्या पुरोगामी संपादक महिलेचा ज्या विचारसरणीने खून केला तो विचारस्वातंत्र्याचा खून आहे .पर्यायाने लोकशाहीच्या चौथ्या स्थंभावरच हा आघात आहे .असे विचार ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार डॉ.सुभाष देसाई यांनी मंगळवारी कोनवडे येथे जाहीर सभेमध्ये मांडले .
विवेकांनद प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .डॉ देसाई पुढे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून डॉल्बीपेक्षाही भयानक आणि समाजघातक म्हणजे धर्माच्या नावावर बेहिशोबी काळा पैसा जमवणाऱ्या पुजाऱ्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश शासनाने अमलात आणावा .सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही देव किंवा मंदिर कोणाच्याही व्यक्तिगत मालकीचे असू शकत नाही .हि समाजाची मालकी असते .त्यामुळे पंढरपूरप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच मठ मंदिरांना हा कायदा लागू करावा .मग आम्ही चंद्रकांतदादाची मिरवणूक हत्तीवरून काढू .तसेच त्यांची जमीन महसूल विभागाकडून चंद्रकांत दादांच्या भुदरगड तालुक्यातील आणि गडहिंग्लज तालुक्यातील शंकराचार्यांना छत्रपती शंभूराजांना १८४८ साली शेतसारा गोळा करण्यासाठी जमिनी दिल्या .त्या ज्या कारणासाठी दिल्या त्याचे पालन जर झालेले नाही तर त्या जमिनी त्यांच्या ऐषआरामासाठी नाहीत .म्हणून त्या शेतकऱ्यांना देण्याचा अधीकार शासनाला आहे
तसेच रवींद्र गुरव यांनी स्वागत केले डॉ राजीव चव्हाण व सिद्धांत सुपल यांनी पोवाडा सादर केला .
Leave a Reply