
कोल्हापूर : डॉल्बी बंद करणे यावर मी आणि प्रशासन ठाम राहिलो.काहीवेळा कठोर भूमिका घ्यावी लागली पण याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.पण जनतेच्या हिताचा विचार करता हा योग्य निर्णय आहे.आणि मतांचे राजकारण करण्यापेक्षा समाजाला आणि देशाला काय हवे आहे हे मांडणारा मी लोकप्रतिनिधी आहे.त्यामुळे स्वस्त लोकप्रीयातेच्या मागे मी धावणार नाही असे परखड मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.कठोर भूमिका ही व्यक्तिगत स्वार्थासाठी नसून जनतेच्या हितासाठी आहे.आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी वाद नाही.ते माझे स्नेही आहेत.रात गयी बात गयी असे म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या विकासाला गतिमान करण्यासाठी हातभार लावावा.एकत्र येऊन पाच हजार बेरोजगारांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असाही टोला दिला. तालीम संस्था जागल्या पाहिजेत त्यांना मदत करणे गैर नाही.त्यामुळे डॉल्बीसाठी पैसे वाटप झालेले नाही.नुकसान झालेल्या डॉल्बी विक्रेत्यांना भरपाई देऊ.पुन्हा डॉल्बी कधीच वाजणार नाही.नियम म्हणजे नियम आहे.त्याचे पालन झालेच पाहिजे.जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच डॉल्बी बंद करण्यात यशस्वी झालो आहे.असेही दादा म्हणाले.
Leave a Reply