
विद्यापीठाच्या एम.बी.ए अधिविभागाकडून दि.8 सप्टेंबर रोजी इंडस्ट्रियल इन्स्टिटयूशन इंटरॅक्शनचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमधील सभागृहामध्ये करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचा उद्देश हा औद्योगिक संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्च पदस्थ व्यक्तींशी विद्यार्थ्याचा संवाद वाढविणे आणि विद्यार्थ्यांना व्यवसाय विषयक वस्तुस्थितीची जाणीव करून देणे हा आहे. शैक्षणिक वर्ष सन 2017 -18 या वर्षीच्या इंडस्ट्रियल इन्स्टिटयूशन इंटरॅक्शन या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उद्योजक आनंद माने, साऊंड कास्टींगचे चेअरमन व्ही. एन. देशपांडे, मार्केटिंग व्यवस्थापक संजिव तुंगतकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक अर्थव्यवस्था, त्यातील भारताचे स्थान आणि भारतीय अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती एम.बी.ए.अधिविभागाचे संचालक डॉ. एच. एम. ठकार यांनी दिली आहे.
Leave a Reply