
पुणे : संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा बाजीराव मस्तानी हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय.त्यातील पिंगा हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी पेशव्यांचे वंशज उदयनराजे पेशवे यांनी केली आहे.काशीबाई आणि मस्तानी या दोघीही घरंदाज होत्या.त्या अशा एकत्रित येऊन नृत्य करतात असा चुकीचा इतिहास या गाण्याद्वारे दाखविला जात आहे.हा समस्त स्त्रिया आणि महाराष्ट्राचा अपमान आहे.असे त्यांचे म्हणणे आहे.यावर संजय भन्साळी यांनी हा एक चित्रपट आहे.मनोरंजनासाठी हे गाणे घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे.पिंगा हे गाणे चित्रपटात राहणार कि काढणार हे आता पुढील काळ ठरवेल.
Leave a Reply