अतिवृष्टीमुळे हानी झालेली परिस्थिती महापालिकेच्यावतीने विशेष मोहिम राबवून पुर्ववत

 

कोल्हापूर : शहरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या ठिकाणी आज महापालिकेच्यावतीने मोहिम राबवून परिस्थिती पुर्ववत आणण्यात आली.
मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. पाण्याच्या लोढयांने वाहने वाहून नाल्यामध्ये अडकल्या होती. काही ठिकाणी भिंत खचल्या होत्या. झाडे पडली होती. पाणी तुंबून राहिले होते. रस्त्याच्या कडेचा भराव वाहून गेला होता. याठिकाणी महापालिकेच्या अग्निशमन, आरोग्य व पवडी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तातडीने विशेष मोहिम राबूवन परिस्थिती पुर्ववत आणण्यात यश मिळविले.
याअंतर्गत नाल्यात वाहून आलेली वाहने, कंटेनर क्रेनच्या साहय्याने बाहेर काढण्यात आली. साचलेले पाणी निर्गत करण्यात आले. किटकनाशक औषध फवारणी करुन परिसरात स्वच्छता करण्यात  आली. अग्निशमन विभागाकडून उन्मळून पडलेली झाडे, फांदया हटविण्यात आल्या. पवडी विभागाकडून रस्त्यावरील सर्व अडथळे हटविण्यात आले.
दरम्यान पावसाचे पाणी शिरुन हानी झालेल्या ठिकाणी आ.राजेश क्षीरसागर, आ.अमल महाडिक, आ.सुजित मिणचेकर, महापौर सौ.हसिना फरास, आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.
गांधी मैदान कार्यालय अंतर्गत प्र.क्र.67 रामानंदनगर व 78 रायगड कॉलनी बाबा जरनगर मधील मल्हार कॉलनी, आशीयाना कॉलनी, जरगनगर कमान ते जोतिर्लिंग कॉलनी रस्तेवरील पुलाचा भाग खचलेने त्याठिकाणी बॅरेकेटींग लावण्यात आले. तसेच पडलेली कपौंड वॉल काढणेत आली. प्र.क्र.70 राजलक्ष्मीनगर मधील शाम सोसायटी जवळ पाणी साठलेले चाच मारुन पाणी निर्गत केले. तसेच ओढयामध्ये वाहून गेलाला कंटेनर बाहेर काढण्यात आला व रस्त्यावर पसरलेला गाळ व खडी काढण्यात आली. सुश्रुषानगर व राजलक्ष्मीनगर येथे रस्त्यामध्ये साचलेले पाणी चाच मारुन गाळ काढण्यात आला. प्र.क्र.73 फुलेवाडी रिंग रोड मधील डायना टाऊन जवळ येथील अपार्टमेटचे कपौड वॉल व शिवशक्तीनगर येथील चाचीमध्ये पडलेली कपौड वॉल काढून पाणी निर्गत करण्यात आले. प्रभाग क्र.76 साळोखेनगर येथील संभाजी विद्यालयालगत पुलाचा भराव ढासळलेने रस्ता खचला असलेने रस्त्याचा धोकादायक भाग, नारळाच्या धोकादायक फादया छाटून एका बाजूने रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.
शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनी या ठिकाणी लहान पुलाजवळ पाणी तुंबलेने या परिसरातील ओढयातील पाणी जवळच्या इमारतीमध्ये 5 ते 6 फुट शिरले होते. तसेच वाहनेही वाहून गेली होती. या ठिकाणीच्या ओढयातील गाळ जेसीबीने काढून पाण्याचा निचरा केला. तसेच पुलाजवळील वाहून गेलेला भराव मुरमाने भरुन घेवून रस्ता वाहतुकीस खुला केला. हुतात्मा पार्क-वाय.पी.पोवारनगर येथील औद्योगिक वसाहतीतील चार कारखान्यामध्ये ओढयाचे पाणी शिरले होते. यशवंत आयर्न कारखान्याची 40 फुट लांबीची दगडी भिंत ढासळली होती. सदर ठिकाणी साचलेले पाणी निर्गत करण्यात आले. मंडलिक वसाहत सम्राट कॉम्प्लेक्स येथे 10 घरामध्ये पाणी शिरले होते. यलम्मा देवालयजवळ पुलावर पाणी आलेने दोन दुकानामध्ये पाणी शिरले होते. सदर ठिकाणचे पाणी निर्गतीची व्यवस्था ठेवून साफसफाई करण्यात आली.  लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील साचलेले पाणी निर्गत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!