
कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून शहरात सायंकाळी धुंवाधार पाउस पडत आहे. काल बुधवारी सायंकाळी पावसाने शहरात थैमान घातले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शहराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नाल्यांच्या काठाला असणाऱ्या नागरी वस्तीमध्ये पाणीच पाणी झाल्याने अवघ्या मध्यरात्रीत पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे या परिसरातील नागरिकानी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. या पावसामध्ये काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असून, विल्सन पुलावरील फुलेश्वर महादेव मंदिराचे शेड पाण्यात वाहून गेले आहे. काल रात्रभर भागातील नागरिक आणि शिवसैनिकांकडून मदत कार्य सुरु आहे.
आज सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाय.पी.पोवार नगर, शास्त्रीनगर, उद्यमनगर, शाहूपुरी कुंभार गल्ली आदी भागाची पाहणी केली. या परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या यादवनगर येथील यशोदा कांबळे आणि शास्त्रीनगर येथील संदीप घाटगे यांच्या कुटुंबियाना आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीची प्रत्तेकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यासह विल्सन पुलावरील फुलेश्वर महादेव मंदिराचे नवीन शेड बांधण्याकरिता पन्नास हजार रुपयांची मदत देण्याचीही ग्वाही दिली.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी तहसीलदार, महानगरपालीकेचे अधिकार्यांना बोलावून आवश्यक पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. यासह तातडीने या परिसरातील स्वच्छता करून औषध फवारणी करण्याच्या सुचना दिल्या. नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका, असे स्पष्ट शब्दात सुनावले
Leave a Reply