
स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतील नायिका असलेली सानिका चाहत्यांची दाद मिळवत आहे. हीभूमिका साकारणाऱ्या नक्षत्रा मेढेकरला तिच्या फॅन्सनी भेटून तिच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.आपली भूमिका प्रेक्षकांना आवडतेय, याचे काही अनुभव नक्षत्राला नुकतेच आले. गणेशोत्सवानिमित्त नक्षत्राखरेदीसाठी ठाण्यातल्या एका मॉलमध्ये गेली होती. तिथं तिला एका आजींनी ओळखलं. इतकंच नाही, तर आपल्यासुनेला आणि नातीला बोलावून घेतलं. त्या तिघींनाही तिचा अभिनय आवडत असल्याचं आवर्जून सांगितलं आणितिच्याबरोबर सेल्फीही काढला. त्यापूर्वी नक्षत्रा नगरला एका इव्हेंटसाठी गेली होती. नगरमधील एका रेडिओस्टेशनवर तिची मुलाखत होती. त्या रेडिओ स्टेशनवरील आरजे चैतालीला नक्षत्रा अर्थात सानिका आल्याचं माहीतनव्हतं. मात्र, नक्षत्राला पाहिल्यावर ती एकदम खूश झाली. ती नक्षत्राची खूप मोठी फॅन होती. त्यामुळे त्या दोघींनीमालिका, सानिकाची व्यक्तिरेखा या विषयी गप्पा मारल्या.खलनायक किंवा ग्रे शेड साकारलेल्या कलाकारांवर अनेकदा प्रेक्षक राग व्यक्त करतात. मला मात्र तसा अनुभवआला नाही. उलट, माझी भूमिका ग्रे असूनही प्रेक्षकांना आवडतेय, हे पाहून मला फार छान वाटलं,’ असं नक्षत्रानंसांगितलं.भरकटत चाललेल्या आपल्या नवऱ्याला म्हणजेच साकेतला पुन्हा संसाराकडे आकर्षित करायला, मालिकेमध्येसानिकाने मॉडर्न परिधान केलेले दिसत आहे. भावनिक नात्यांतील सुरेख गुंतागुंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल स्टारप्रवाहाच्या ‘लेक माझी लाडकी’ मध्ये सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता.
Leave a Reply