भविष्याची ऐशी तैशी द प्रेडिक्शन” ६ ऑक्टोबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात

 

रोज सकाळी पेपर वाचताना सहज आपले लक्ष्य, आजचा दिवस कसा जाईल, आजचे भविष्य.. ह्या सदरांकडे जातेच. भविष्याबद्दल कुतूहल सगळ्यांनाच असते. विश्वास असो वा नसो पण सगळेच ह्या सदरावर नजर फिरवितात. प्रिया, मेघा, निशी तीन मैत्रिणी. मेघाचा ज्योतिषावर ठाम विश्वास. प्रियाला मात्र सर्व भोंदूगीरीचे, फसवणुकीचे प्रकार वाटतात. निशी मात्र गोंधळलेली, तिला कधी मेघाचे विचार पटतात तर कधी प्रियाचे.अश्यात त्यांच्या जीवनात करमरकर नावाच्या ज्योतिषीने केलेल्या भविष्यवाणीने वादळ उठते. त्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवायला मन तयार नसते, पण दुर्लक्ष करणे शक्य नसते.. कारण खरच ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे घडले तर…
भारतातील पहिला ज्योतिष विषयक रोमांचक चित्रपट “भविष्याची ऐशी तैशी.. द प्रेडिक्शन” दिनांक ६ ऑक्टोबर, रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटाचे नुकतेच म्युझिक लौंच दादर येथे संपन्न झाले, “भविष्याची ऐशी तैशी.. द प्रेडिक्शन” या चित्रपटात एकूण ४ गाणी असून, सौ चंद्रा रमेश तलवारे यांच्या गीतांना संगीतकार सलील अमृते ने आजच्या पिढीला आवडतील अशीच मधुर केली आहेत. सौ. चंद्रा रमेश तलवारे लिखित व सुरेंद्र वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात वर्षा उसगावकर, संदीप कोचर, आसावरी जोशी, जु. स्वप्नील जोशी, पंकज विष्णू, आनंदा कारेकर, किशोर नांदलस्कर, प्रवीण तलवारे यांनी भूमिका केल्या असून रुचिता जाधव, मानसी नाईक, करोल झिने यांच्या धम्माल मैत्रीच्या केमिस्ट्रीने चित्रपटात रंग भरला आहे. रमेश तलवारे निर्मित या चित्रपटाने बऱ्याच दिवसा नंतर एक वेगळा रोमांचक चित्रपट बघितल्याचे समाधान मिळणार आहे.
रमेश तलवारे निर्मित. कथा-पटकथा-संवाद-गीतकार-क्रीएटीव डिरेक्टर : सौ. चंद्रा रमेश तलवारे, दिग्दर्शक : सुरेंद्र वर्मा, छाया : अरविंदसिंग पुवार, संगीत : सलील अमृते, संकलन : दिपक वाय विरकुड, विलास रानडे, ve=l³e efoioµe&keÀ : राहुल सक्सेना, बॉबी सयेद. पी.आर.ओ. स्वप्ना संत, सचिन शिंदे.
रमेश तलवारे निर्मित भविष्याची ऐशी तैशी.. द प्रेडिक्शन” हा चित्रपट ६ ऑक्टोबर, रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना बऱ्याच दिवसानंतर एक वेगळा थरारक रोमांचक चित्रपट पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!