
कोल्हापूर : सर्व धार्मिक स्थळांचा विकास करुन पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्नशिल आहे. करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरास केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता वाढून पर्यटकांचा ओघ वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
श्री करवीर निवासनी अंबाबाई मंदिरास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमनातून करण्यात आलेल्या अर्किटेक्चरल इल्युमिनेशन कामाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षिरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी 78 कोटी रुपयांचा विकासा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. यामध्ये दर्शन मंडप, भक्त निवास पार्किंग, सुरक्षा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. मंदिरावर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता अधिक वाढणार असून देवीला ज्या रंगाची साडी नेसवली जाईल त्याच रंगाची रोषणाई राहणार आहे. पर्यटक व भाविकांसाठी हे चांगले आकर्षण ठरणार असून त्यामुळे भाविकांचा ओघही वाढेल असे विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. देवस्थान समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवावेत. परिसरात सदैव स्वच्छता रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार धनंजय महाडिक यांनी अलिकडच्या काळात मंदिरातील वातावरण अधिकाधिक समाधानकारक होत असल्याने भाविक व पर्यटक समाधानी होत आहेत. त्यामुळे देश विदेशातील पर्यटकांचा व भाविकांचा ओघही वाढणार आहे, असे सांगून सुवर्ण पालखीसाठी सर्वस्तरातील भाविकांनी दान दिल्याने 8 कोटी रुपयांची सुवर्ण पालखी तयार झाल्याचेही यावेळी ते म्हणाले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष
Leave a Reply