
कोल्हापूर : जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पुढील काळातील संभाव्य पाणी टंचाई विचारात घेवून 33 टक्क्यापेक्षा कमी पाणी असणाऱ्या प्रकल्पामध्ये सरासरी किमान 15 टक्के अथवा मागणीनुसार पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस आ. अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह सर्व संबधित विभागांचे अधिकारी जिल्ह्यात 4 मोठे, 9 मध्यम आणि 53 लघू प्रकल्प असून यापैकी 16 धरणे 100 टक्के भरले आहेत.
तथापि आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेऊन पाण्याचा नियोजनबध्द वापर होणे आवश्यक आहे. यासाठी ज्या धरणांमध्ये 33 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे अशा ठिकाणी सरासरी 15 टक्के किंवा मागणी जास्त असेल तर त्या प्रमाणात पाणी आरक्षित करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. यावेळी त्यांनी मनुष्य व प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपसाबंदीचे काटेकोर पालन करावे यासाठी तहसिलदार आणि पाटबंधारे विभागाने दक्षता घ्यावी असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जे तलाव कोरडे पडतील त्यामधील गाळ काढण्याची मोहिम प्रशासनाने हाती घ्यावी व पुढील 50 वर्षांसाठी पाणीसाठविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे नियोजन कारावे असे सांगून तलावातील गाळ काढण्यासाठी महात्मा फुले जलसंधारण योजनेतून त्यासाठी डिझेलचा खर्च दिला जाईल असे सांगितले. कोल्हापूर शहरासाठी अवश्यक असणारे 2.3 टी. एम. सी. पाणी आरक्षित असून सध्यस्थितीत तेवढे पाणी पुरेसे असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी नगरपालिकानिहाय पाणी आरक्षाणाच्या आवश्यकतेसंबध चर्चा करण्यात आली.याबैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अजय इनामदार, विजय पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply