
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या प्राधान्यक्रमाच्या गरजा आणि अडचणी जानेवारी अखेर दूर केल्या जातील असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आ. राजेश क्षिरसागर, आ. अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, समितीचे सदस्य महेश जाधव, अजित गायकवाड, सौ. शितल रामुगडे, डॉ. सुरेखा बसरगे, डॉ. इंद्रजीत काटकर, डॉ. अजित लोकरे, सुनिल करंबे, यांच्यासह अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद अदी मान्यवर आणि सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयास भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याबरोबर अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले, या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यामध्य वर्क कल्चर निर्माण करणे गरजेचे असून कामांमध्ये सुसुत्रता, वक्तशिरपणा आणि सेवाभावी वृत्ती जोपासण्यावरही अधिक भर देणे गरजेचे असून याकामी अधिष्ठाता आणि अन्य अधिकाऱ्यांनी प्राधान्य रुग्णालयास लागणाऱ्या औषधांबरोबरच अन्य सेवा सुविधांचा आराखडा तात्काळ तयार करावा त्यानुसार रुग्णालयाच्या अडीअडचणी पुर्ण करण्यास प्राधान्य राहील असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. शासनस्तरावर रुग्णालयाच्या प्रंलबित प्रस्तावांचा पाठपुरावा करुन हे प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील असे ही ते म्हणाले.प्रारंभी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी स्वागत करुन रुग्णालयाच्या अडीअडचणी विशद केल्या यावेळी आमदार महोदय तसेच अन्य सदस्यांनीही रुग्णालयासंदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले.
Leave a Reply