
कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणातील समीर गायकवाड याला पोलिसांकडून त्याने ब्रेन मॉपिंग साठी होकार द्यावा यासाठी दबाव टाकला . या बदल्यात 25 लाख रुपये देऊन यातून सहिसलामत बाहेर काढू नाही तर समीरच्या कुटुंबातील एकही व्यक्ती जीवंत राहणार नाही.आणि तुला फासावर लटकवू असा गौप्यस्पोट आज समीरने न्यायालयात हजर केले तेव्हा केला. यामुळे या प्रकरणास वेगळी कलाटणी मिळाली आहे. ब्रेन मॉपिंग वेळी न्यायालयाच्या पायऱ्या चढ़ताना त्याच्या कानात मी पोलिस आहे असे सांगून ही धमकी दिल्याचे समीरने आज न्यायमूर्ति यादव यांच्यासमोर सांगितले.माझ्या तोंडावर बुरखा असल्याने मला ती व्यक्ती दिसली नाही.आणि 9 अक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले तेव्हा माझी मानसिक स्थिति ठीक नव्हती म्हणून मी त्यावेळी काही सांगितले नाही असेही त्याने सांगितले.
Leave a Reply