
कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसीत करण्यात येत आहे. समाधीच्या मेघडंबरीच्या कामाची आज बापट कॅम्प येथे महापौर सौ.हसिना फरास यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यासमवेत पाहणी केली. महापौर सौ.हसिना फरास यांनी येत्या दिड महिन्यात मेघडंबरीचे काम पुर्ण करण्याच्या सुचना शिल्पकार किशोर पुरेकर यांना दिल्या.
नर्सरी बागेतील रा.शाहू महाराज समाधीस्थळाच्या कामाची शुक्रवार दि.22 सप्टेंबर रोजी महापौर सौ.हसिना फरास यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी संरक्षक भिंतीचे कामाची निविदा 30 सप्टेंबर पर्यंत काढणेच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पाहणीवेळी मेघडंबरीचे काम अद्यापही पुर्ण झाले नसलेचे निर्दशनास आले. यावेळी हे काम सुरु असणाऱ्या ठिकाणी मंगळवार दि.26 रोजी पाहणी करण्याचा निर्णय झाला. यानुसार आज महापौर सौ.हसिना फरास व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मेघडंबरीच्या कामाच्या ठिकाणी जावून कामाची माहिती घेतली.
यावेळी महापौर सौ.हसिना फरास यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळाचे काम हे कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे हे काम तातडीने होणे आवश्यक आहे. इतर कामे बाजूला ठेवून मेघडंबरीचे काम तातडीने दिड महिन्यात पुर्ण करा अशा सुचना केल्या.
समाधीची मेघडंबरी पाषाणात न बनवता ब्रॉन्झ धातूपासून करण्यात येणार आहे. यासाठी प्रथम मेघडंबरीचे मोल्डींग तयार करण्यात येत आहे. मोल्डींगचे काम अंतिम टप्यात आहे. दि.1 ऑक्टोंबर रोजी तयार झालेले मेघडंबरीचे फायबरमधील मोल्डींग समाधीस्थळी प्रत्यक्ष बसवून पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मेघडंबरी ब्रान्झ धातूमध्ये बनविण्यात येणार असलेची माहिती वास्तुशिल्पी अभिजीत जाधव यांनी दिली.
यावेळी गटनेता सत्यजित कदम, नगरसेवक राजसिंह शेळके, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, प्र.सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, माजी नगरसेवक आदील फरास, परिक्षित पन्हाळकर, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते
Leave a Reply