
कोल्हापूर :शारदीय नवरात्र उत्सव यानिमित्ताने द आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने होम आणि हवन यांचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर यादरम्यान या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशी माहिती द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोल्हापूर शाखेच्या डिंपल गजवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली परमपूज्य श्री श्री रविशंकर संस्थापित द आर्ट ऑफ लिव्हिंग दरवर्षी नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून विविध होम करत असतात स्वतः गुरुजी यावेळी बेंगलोर आश्रमांमध्ये होम करतात त्याचवेळी भारतात सर्वत्र होम केले जातात यामुळे उपस्थितांना गहऱ्या ध्यानाचा अनुभव प्राप्त होतो तसेच मानवी जीवनातील आणि वातावरणातील तणाव प्रदूषण आणि नकारात्मकता कमी होते असा अनुभव आहे या धार्मिक कार्यक्रमांसाठी बेंगलोर आश्रमहून ऋषी नित्यप्रज्ञाजी कोल्हापूरमध्ये येत आहेत. हे विधी करण्यासाठी आश्रमातील वेद विज्ञान महाविद्यापीठातून वेदाचार्य दाखल झाले आहेत. या कालावधीत होम सत्संग महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि दांडिया होणार आहे.हे सर्व धार्मिक कार्यक्रम
आयर्विन मल्टीपर्पज हॉल गवत मंडई शाहुपुरी येथे होणार आहेत यामध्ये गणपती होम नवग्रह होम वास्तुशांती होम रुद्र होम सुदर्शन होम आणि 28 सप्टेंबर रोजी महाचंडी होम जीवनात सर्वांगीण प्रगतीसाठी केला जाणार आहे. तरी सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन द आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने करण्यात आले आहे .पत्रकार परिषदेला मंदिर चव्हाण,आशिष चंदवानी अजय किल्लेदार,निखिल अग्रवाल, समीर भरवले, अनिमा दहिभाते, पुनम कुलकर्णी, बिना पटेल आदी उपस्थित होते.
Leave a Reply