
सर्व महत्वाची धार्मिक स्थळं, रेल्वे, हवाई आणि रस्ते मार्गानं जोडण्याची आपली मागणी आहे. त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद लाभलाय. त्याचाच एक भाग म्हणून, कोल्हापूर-शिर्डी रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी आपण पाठपुरावा केला. त्याला यश आलं असून, आजपासून आठवड्यातून एकदा ही रेल्वे धावणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु होवून चांगला प्रतिसाद लाभल्यास, आठवड्यातून तीनवेळा आणि कालांतरानं दररोज ही गाडी सुटेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर नव्या गाडीचं इंजिन पूजन करुन ती शानदार सोहळ्याद्वारे रवाना करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच बेळगाव जिल्ह्यातून शिर्डी इथं साई दर्शनासाठी जाणार्या भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळं कोल्हापूर ते शिर्डी दरम्यान रेल्वे सुरू करण्याची मागणी होती. खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत आवाज उठवल्यानं तसंच रेल्वे मंत्रालयाकडं केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आलं आणि रेल्वे विभागानं कोल्हापूर ते शिर्डी मार्गावर आठवड्यातून एकदा रेल्वे सुरु करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर प्रत्येक बुधवारी ही गाडी धावणार आहे. आजपासून तीन बुधवार कोल्हापूर ते शिर्डी अशी थेट गाडी सुरु झालीय. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे इंजिन फुलांनी सजवण्यात आलं. लोकोपायलट गणेश सोनावणे, असिस्टंट लोकोपायलट रंजन प्रसाद, गार्ड विठ्ठल गावडे यांना फेटा बांधण्यात आला. त्यानंतर हलगीच्या कडकडाटात मान्यवरांचं स्वागत झालं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना रेल्वे पॅसेंजर संघटनेचे मोहन शेटे म्हणाले, रेल्वे स्थानकाशी निगडीत गेल्या अनेक वर्षांची प्रलंबित कामं खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून मार्गी लागली आहेत. खासदार महाडिक म्हणाले, सर्व धार्मिक स्थळं, रेल्वे आणि आणि हवाई मार्गानं जोडण्याची आपली मागणी आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यानुसार कोल्हापूर-शिर्डी ही थेट गाडी सुरु करण्यात यश आलं. सध्या आठवड्यातून एकदा ही गाडी सुटणार असली, तरी चांगला प्रतिसाद मिळाल्यास, आठवड्यातून तीनवेळा आणि पुढील टप्प्यात दररोज गाडी कोल्हापुरातून सुटेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. शिर्डी संस्थानच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गुरुवारी शिर्डी विमानतळाचं उद्घाटन होत आहे. त्याच दिवशी कोल्हापूर ते शिर्डी अशी थेट रेल्वे सुरु होणं म्हणजे सुवर्ण योग आहे, असं प्रतिपादन खासदार महाडिक यांनी केलं. त्यानंतर आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते, महापौर हसिना फरास, चॅनल बी च्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत गार्ड आणि लोकोपायलट यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सौ. महाडिक, महापौर फरास आणि मान्यवरांच्या हस्ते इंजिन पूजन करण्यात आलं. तर खासदार महाडिक यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना केली. गाडी सुटताना पावसानंही हजेरी लावली. आज सुटलेल्या गाडीत स्लीपर कोचमध्ये १७५, तर एसी कोचमध्ये १५ जणांचं आरक्षण झालं होतं. कार्यक्रमाला रेल्वे बोडर्ाचे सदस्य समीर शेठ, स्टेशन प्रबंधक सुग्रीव मीना, गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक ईश्वर परमार, रुपाराणी निकम, स्मिता माने, किरण नकाते, संजय मोहिते, राजसिंह शेळके, उज्वल नागेशकर, अरुण चोपदार, सिद्धार्थ लाटकर, शिवनाथ बियाणी, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, रमेश तनवाणी, मोहन शेटे, यादव महाराज, श्रीवल्लभ बांगड, राजेंद्र मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हेरलेकर बंधूंनी पोवाडा सादर केला.
Leave a Reply