
कोल्हापूर :चौधरी यात्रा कंपनी आणि नाशिक येथील स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोंत्सवामध्ये देवी सती मातेच्या देशविदेशातील 51 शक्तिपीठांच्या भव्य छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 29 सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे. हे प्रदर्शन महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरासमोरील कारंडे यांच्या हॉलमध्ये भरवण्यात आले असल्याची माहिती स्वहिंदू ट्रस्टचे सुनील सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतासह नेपाळ, तिबेट, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांग्लादेशातील देवी सती मातेच्या 51 शक्तिपीठातील अत्यंत दुर्मिळ अशा मुर्त्यांचे अविस्मरणीय दर्शन एकाच ठिकाणी घेण्याची अनमोल संधी या निमित्ताने लाभणार आहे. भारतीय उपखंडात, विदेशात आणि भारतातील विविध राज्यात असलेल्या या महत्वपूर्ण शक्तिपीठांची माहिती अनेकांना नसते. या प्रदर्शनामुळे ही माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. तरी भाीवकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला भानुदास महाराज यादव आणि सागर कसबेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply