
कोल्हापूर: कोल्हापूर शहर श्वान दंश निर्मित सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शनच्या वतीन रेबीजमुक्त कोल्हापूर मोहिमेस आज पासून सुरुवात झाली.कोल्हापूर सोसायटी फॉरअॅनिमल प्रोटेक्शन म्हणजेच सॅपच्यावतीने कोल्हापूर शहरातील भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याची मोहीम आजपासून सुरू झाली आहे. राजारामपुरी येथील पाचव्या गल्लीतील हॉस्पिटलमध्ये राजारामपुरी येथील श्वानांसाठी सर्वप्रथम पाळीव श्वानांची संख्या त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण झाले आहे किंवा नाही माहितीचे संकलन संस्थेच्या वतीने घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. त्यानंतर मोकाट व भटक्या श्वानांची अचूक मोजदाद करून राजारामपुरी पहिली गल्ली ते पाचवी गल्ली या भागातील श्वानांना रेबीजचे लसीकरण करण्यात येणार आहे. 2 आक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून या प्रकल्पास आजपासून सुरुवात झाली. राजारामपुरी नंतर शहराच्या विविध भागातील श्वानांचे लसीकरण, जंतनिर्मूलन आणि वेदनाशामक व जंतुनाशक औषधोपचार तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहेत. भटके व मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये शहरात आजवर अनेकजण जखमी झाले तसेच त्यांना रेबीज या कुत्र्यांपासून होणाऱ्या रोगाने ग्रासले. यासाठीच ठोस उपाययोजना म्हणून संस्थेने हा प्रकल्प हाती घेतला आहे अशी माहिती सचिव डॉ. दिगंबर चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सहसचिव अभिजीत पाटील,योगिता पाटील उपस्थित होते.
Leave a Reply