
कोल्हापूर : स्वदेशी जागरण मंचच्यावतीने 2 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानास सुरुवात झाली आहे. सध्या भारत आणि चीनदरम्यान तणावाची परिस्थिती असून चीन विविध मार्गाने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारताचा शत्रू पाकिस्तान या दहशतवादी राष्ट्रात मदत करत आहे. या परिस्थितीत चीनच्या व्यापारी आक्रमणास तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा अभियान हाती घेतले आहे अशी माहिती जिल्हा कार्यवाह केदार जोशी आणि प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले 190 देशांशी भारताचे व्यापारी संबंध आहेत. यामध्ये 56 टक्के वापरातील वस्तू या भारतामध्ये चीनने उत्पादित केलेल्या असतात. जर या वस्तू भारतातील लोकांनी वापरण्याचे टाळले तर याचा मोठा परिणाम चीनच्या आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो. आज चीन भारतीय सीमेवर घुसू पाहत आहे.यासाठी लागणाऱ्या सर्व पैसा चीनला भारताकडून मिळत आहे. म्हणूनच आपण चीनी वस्तु वापरावर बंदी केली तर चीनच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो तसेच ज्या वस्तूंना पर्याय नाही उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल अशा वस्तू आपण जपान किंवा कोरिया या देशाच्या वापरू शकतो. यामुळेही चीनला याचा आर्थिक फटका बसू शकतो. तसेच भारत सरकारने 40 चिनी वस्तू आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. आणखी 50 चीनी उत्पादित वस्तू बंदी घालण्याचा प्रक्रियेत आहेत. पण तो पर्यंत तरी आपण चिनी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तू वापरावे यासाठी महिला बचत गट महाविद्यालये ,शाळा या सर्व ठिकाणी जाऊन हे स्वदेशी अभियान राबविले जाणार आहे. आणि लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली जाणार आहे. पत्रकार परिषदेला संयोजक केशव गावेकर अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते.
Leave a Reply