
कोल्हापूर :भारतीय राज्यघटना आणि न्यायव्यवस्था बदलण्याची भाषा करणाऱ्या राजसत्तेला चातुवर्ण्यावर आधारित मनुस्मुतीचा कायदा हवा आहे .त्यासाठी साम,दाम ,दंड ,भेद या क्रूर चाणक्य नीतीचा वापर देशभर सुरु आहे .वास्तविक हा समाजद्रोह आणि देशद्रोही आहे .मनुवादी त्यासाठी बहुजनांचा वापर करतात हे बहुजन समाजाचे दुर्देव आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीत छ.शाहू ,फुले,आंबेडकरांच्या विचारांनापायदळी तुडवू न देण्याचा निर्धार छ शाहू भक्तांनी ,श्री अंबाबाई भक्तांनी करावा असे आव्हान श्री अंबाबाई मंदिर भ्रष्ट पुजारी हटाव समितीच्या वतीने आज डॉ . सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.समितीच्य सर्वात प्रमुख मागणीपासून समाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी देवीच्या नावाचा प्रसादाचा वाद निर्माण केला जात आहे मंदिर वा मूर्ती किंवा शासन नियुक्त देवस्थान कमिटी म्हणजे कोणाची खासगी जहागिरी नव्हे शासन हे लोकशाहीत जनतेचे सेवक आहेत आपल्या मर्यादा ओळखून आणि लाखो छ. श्री शाहू व श्री अंबाबाईच्या भक्तांच्या भावनेला लाथाडु नका अन्यथा समाज तुम्हाला लाथाडेल कोणतीही सत्ता नि खुर्ची अमरपट्टा घेऊन आलेली नाही याचे भान ठेवा.असेही डॉ देसाई म्हणाले.
नवरात्रीत मिळणारे कोट्यावधी रुपयांचे काळे धन पुजाऱ्यांना मिळावे यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत झाली हि निषेधार्ह बाब आहे .देवस्थान कमिटीचे नूतन अध्यक्षांनी कमिटीचे दान पेटीतील ५२ कोट रुपये पुजाऱ्यांच्या हलकटपणामुळे कोर्टात अडकलेत ते बाहेर काढावेत त्यांनी करवीरकरांना आश्वासन दिल्या प्रमाणे श्री अंबाबाई मूर्तीवरचा नाग फोडणाऱ्यांना शासन करून त्याची पुनःस्थापना करावी हे सोडून नामकरण बदलण्याचा गैरकारभार करू नये अन्यथा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा
तेलंगण सरकारने त्यांचा राज्यातील मंदिरात ६५२५ रु मासिक वेतनावर सरकारी पुजारी नेमले आहेत त्यातील ३० टक्के दलित समाजातील आहेत महाराष्ट्र शासनेही समाजातील सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना पुजारी म्हणून श्री अंबाबाई आणि देवस्थान कमिटीच्या सर्वच मंदिरात नियुक्ती करावी आमची मूळ मागणी पंढरपूर प्रमाणे अंबाबाई मंदिरातील सर्व विद्यमान पुजारी हटवावेत हि आहे याची आठव पालकमंत्री आणि देवस्थान कमिटी अध्यक्षांना करून देतो असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई ,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष डॉ. जयश्री चव्हाण उपस्थित होत्या.
Leave a Reply