
कोल्हापूर:14 ऑक्टोबर हा राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.यानिमित्त कोल्हापुरात या दिवशी फेडरेशन ऑफ ऍडव्हारटायझिंग अँड मार्केटिंग म्हणजे (फेम )आणि ऍड एजन्सीज अँड मिडिया असोसिएशन (आसमा ) कोल्हापूर प्रेस क्लब, कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जाहिरातील साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी हॉटेल पॅव्हेलियन येथे दुपारी 4 वाजता पुरस्कार वितरण समारंभ तसेच तणावमुक्त जीवन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.रोजच्या धावपळीच्या जीवनात अश्या प्रकारच्या व्याख्यानाची या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना गरज आहे. म्हणून हा विषय निवडला अशी माहिती फेमचे अध्यक्ष अमरदीप पाटील आणि आसमाचे अध्यक्ष संजय रणदिवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
14 ऑक्टोबर 1905 रोजी देशातील पहिली ऍड एजन्सी बी दत्ता उर्फ दत्ताराम बावडेकर यांनी मुंबई येथे सुरू केली. तोच दिवस दरवर्षी राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या आधुनिक काळात जाहिरात हे एक प्रभावी माध्यम आहे. ग्राहकाला उत्पादनाविषयी योग्य त्या माध्यमाद्वारे कमी वेळेत अचूक माहिती देऊन अर्थव्यवस्थेत आणि राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकण्यात जाहीरात संस्थांचे योगदान अनन्यसाधारण आहे .त्याचप्रमाणे ज्या माध्यमातून जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवली जाते ती प्रसारमाध्यमं मग ती प्रिंट,इलेक्ट्रॉनिक किंवा ऑनलाइन असोत,आजच्या जगात ही माध्यमे आणि जाहिरात क्षेत्र हे एकमेकांना पूरक व्यवसाय आहेत. याचेच औचित्य साधून फेम आणि आसमाच्यावतीने या पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या राष्ट्रीय जाहिरात दिनी पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रशेखर माताडे दैनिक पुढारी,बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी, दैनिक सकाळचे आनंद शेळके,दैनिक तरुण भारतचे मंगेश जाधव, दैनिक लोकमतचे महेश पन्हाळकर,दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे अशोक राऊत,दैनिक पुण्यनगरीचे जाहिरात प्रतिनिधी दिलीप चौगुले, महासत्ता चे चंद्रकांत मिठारी ,एस न्यूज बाळासाहेब काळे, पंच क्रियेशन चे भरत दैनी आणि फोटो वर्क शॉप एक्स्पर्ट संजय चौगुले या व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष लुमाकांत नलवडे आणि कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ अध्यक्ष चारुदत्त जोशी यांची उपस्थिती राहणार आहे.पत्रकार परिषदेला आसमाचे सचिव राजाराम शिंदे, कार्यकारणी सदस्य अभय मिराशे, कौस्तुभ नाभर मोहन कुलकर्णी,प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एलजी इलेक्ट्रॉनिक्स, बॅंक ऑफ महाराष्ट्र ,ट्रेड विंग्स लि, अथर्व क्लासेस आणि तेंडुलकर कॅटरर्स यांचे सहकार्य लाभले आहे.
Leave a Reply