
कोल्हापूर : दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान मध्यवर्ती बस स्थानातील डेपोला आग लागली. त्यामध्ये ४ जन जखमी झालेत असे वृत्त बाहेर पडले, पाहता पाहत वृत्त शहरात पसरले सर्वत्र धावपळ उडाली. परिसरात एकच गोंधळ उडाला, लोक सैरावैरा धावू लागले त्यामध्ये पडून अनेकजण जखमी झाले तर प्रवाशांचे दीपावलीची खरेदी केलेले साहित्य अस्ताव्यस्त रस्त्यावर पडून नुकसान झाले, लोक भयभीत झाले. अग्निशामक “बंब” घटना स्थळी दाखल झाले, आरोग्य यंत्रणाही पोहोचली. पण काही वेळानंतर कळाले कि हि ‘आग’ लागली नसून शासनाच्या आपत्ती निवारण विभागात आग लागल्यानंतर काय करायचे याचा डेमो सुरू होता. पण हि कवायत प्रवाशांच्या जीवावर बेतली असून यात १ महिलेसह ४ व्यक्ती जखमी झाले आहेत
Leave a Reply